मुंबई

एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचा शेअर अप्पर सर्किटला धडकला

वृत्तसंस्था

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीमध्ये २९.१८ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याचे मंगळवारी जाहीर झाले. त्यानंतर एनडीटीव्हीच्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत आहे आणि बुधवारीही त्याचे शेअर्स अप्पर सर्किट झाले आहेत. एनडीटीव्हीचा शेअर मंगळवारच्या तुलनेत बुधवारी मोठ्या वाढीसह बीएसईवर ३८० रुपयांवर उघडला. अल्पावधीतच तो ५ टक्के वाढून ३८८.२०रुपयांवर पोहोचला. नंतर त्याला अप्पर सर्किट लागले.

चौथ्या दिवशीही अप्पर सर्किटल

यापूर्वी मंगळवारीही एनडीटीव्हीचा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये होता. तो ५ टक्के वाढून ३६६.२० रुपयांवर बंद झाला. आज सलग चौथ्या दिवशी एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट आहे.

एका वर्षात ३८२ टक्के परतावा

एनडीटीव्हीचा स्टॉक ऑगस्ट २००८ पासून सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. या शेअर्सने गेल्या एका महिन्यातच ४२ टक्केचा मजबूत परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात त्याने ३९२.९५ टक्क्यांचा परतावा दिला आहे. एका वर्षापूर्वी म्हणजेच २४ ऑगस्ट २०२१ रोजी एनडीटीव्हीचा शेअर्स ७८.७५ रुपयांवर होता.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल