मुंबई

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना 'लुकआऊट' नोटीस जारी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत 'लुकआऊट' नोटीस जारी केल्याने या दोघांच्या अडचणी वाढल्या आहेत. व्यापारी दीपक कोठारी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, शिल्पा आणि राज यांनी जवळपास ६० कोटी रुपये हडपले असल्याचा आरोप आहे.

Swapnil S

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत 'लुकआऊट' नोटीस जारी केल्याने या दोघांच्या अडचणी वाढल्या आहेत. व्यापारी दीपक कोठारी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, शिल्पा आणि राज यांनी जवळपास ६० कोटी रुपये हडपले असल्याचा आरोप आहे.

दीपक कोठारी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, २०१५ ते २०२३ दरम्यान शिल्पा आणि राज यांनी 'बेस्ट डील टीव्ही प्रा. लि.' या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे घेतले. सुरुवातीला हे पैसे कर्ज म्हणून मागण्यात आले, पण नंतर टॅक्स वाचवण्याच्या कारणावरून त्याला इन्व्हेस्टमेंट दाखवण्यात आले.

प्रकरण काय ?

कोठारी यांचे म्हणणे आहे की, त्यांना १२ टक्के वार्षिक व्याजासह ठरलेल्या वेळेत पैसे परत केले जातील, असा विश्वास देण्यात आला होता. एवढेच नाही, तर एप्रिल २०१६मध्ये शिल्पा शेट्टीने वैयक्तिक हमीपत्रही दिले होते. मात्र, काही महिन्यांतच शिल्पाने कंपनीच्या डायरेक्टरपदाचा राजीनामा दिला आणि नंतर कळले की कंपनीवर तब्बल १.२८ कोटी रुपयांचे दिवाळखोरी प्रकरण सुरू आहे. कोठारी यांचा आरोप आहे की, याची कोणतीही माहिती त्यांना देण्यात आली नाही. उलट कंपनीच्या नावाने घेतलेले पैसे वैयक्तिक खर्चासाठी वापरले गेले.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात; साखरझोपेत असताना २ चिमुकल्यांना अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

दरकपातीचा लाभ मिळणार सामान्यांना! GST सुधारणांचा हेतू स्पष्ट करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विश्वास