BMC Election 2026 : शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले; कोणत्या प्रभागात कोणाला संधी? 
मुंबई

BMC Election 2026 : शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले; कोणत्या प्रभागात कोणाला संधी?

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजप-शिंदे गट जागावाटपानुसार शिंदे गट ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप १३७ जागांवर तर शिवसेना शिंदे गट ९० जागांवर उमेदवार उभे करणार आहे.  सोमवारी (दि.२९) झालेल्या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाला. दोन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून मित्रपक्षांनाही जागा देण्याचे ठरवले आहे. अशातच, वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारांची यादी सादर होत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची नावे :

प्रभाग क्रमांक १९७ -  वनिता नरवणकर

प्रभाग क्रमांक १९२ - प्रिती पाटणकर

प्रभाग क्रमांक १६६- मीनल तुरडे

प्रभाग क्रमांक १५६ - अश्विनी माटेकर

प्रभाग क्रमांक १६० - किरण लांडगे

प्रभाग क्रमांक १६२ वाजिद कुरेशी

प्रभाग क्रमांक १६३ शैला लांडे

प्रभाग क्रमांक १६१ विजय शिंदे

प्रभाग क्रमांक ११ डॉ. अदिती खूरसंगे

प्रभाग क्रमांक १३३ परमेश्वर कदम

प्रभाग क्रमांक २०९ यामिनी जाधव

वडाळा - अमेय घोले

वांद्रे - पल्लवी सरमळकर

कांजूर-भांडुप -सुवर्णा करंजे

वडाळा - पुष्पा कोळी

जोगेश्वरी - राजुल पटेल

भटवाडी-घाटकोपर - अश्विनी हांडे

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने (SEC) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी करून निकाल जाहीर केले जातील.

'तात्काळ देश सोडा'; इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट, भारत सरकारकडून महत्त्वाच्या सूचना

Mumbai : दादरमध्ये BEST बसचा भीषण अपघात; एकामागोमाग एक वाहनांना दिली धडक; एकाचा मृत्यू, Video

फिलिपिन्समध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा हाय अलर्ट जारी, थरकाप उडवणारे Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात जलवाहिनी बिघाडाचा फटका; दुरुस्ती पूर्ण, तरीही अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्यता

मुंबई ‘मेट्रो-१’, १२ वर्षे, १२५ कोटी प्रवासी