मुंबई

धक्कादायक! कुर्ल्यात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

त्या महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबईच्या कुर्ला परिसरातून हृदय हलवून टाकणारी घटना समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला येथे सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. त्या महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणाच्या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह पाहता मृत महिलेच वय 25 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलेनं टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली होती. तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 19 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता सीएसटी रोड, शांती नगर येथे ही सुटकेस आढळून आली होती. त्याठिकाणी मेट्रो रेल्वेचं बांधकाम सुरू असलेल्या बॅरिकेडच्या जवळ एका व्यक्तीला ही सुटकेस दिसली. त्या व्यक्तीला संशय आला आणि त्याने पोलिसांना ताबोडतोब याबद्दल माहिती दिली. सुटकेसची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान ती सुटकेस सापडली. सुटकेस उघडताच त्यात मृतदेह आढळून आला. या महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलेच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा दिसलेल्या नाहीत. पोलिसांचा सध्या या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे.

या प्रकरणी एक एफआयआर नोंदवण्यात आला असून पोलिसांनी सुटकेस सापडलेल्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यामध्ये पोलिसांना अद्याप यश आलं नाही. या प्रकरणात कुर्ला पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेचाही तपासात सुरु आहे. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी अधिकारी सर्व पोलिस ठाण्यातून ज्या महिला बेपत्ता आहेत त्याची माहिती गोळा करत आहेत. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

शहापूर : खालापूरच्या धर्तीवर खुटघर इंटरचेंजचा विकास; मंत्रालय स्तरावर घडामोडी सुरू

पूरग्रस्तांना मदतीचा हात! राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO ची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

मराठा समाज बांधवांना तूर्तास दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे थांबवा; कुणबी समाजाची मागणी