मुंबई

धारावी पुनर्विकासाचा श्रीगणेशा, सामाजिक उपक्रमांसाठी डीआरपीपीएलचा हातभार

गणेशोत्सवादरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी डीआरपीपीएलने धारावीतील २५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आर्थिक सहाय्य करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

Swapnil S

मुंबई : धारावीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा 'धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड' (डीआरपीपीएल) ने हातभार लावला आहे. गणेशोत्सवादरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी डीआरपीपीएलने धारावीतील २५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आर्थिक सहाय्य करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

धारावीतील सार्वजनिक गणेशोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबतच मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत विविध मंडळांकडून आरोग्य तपासणी शिबीर, मोफत नेत्र चिकित्सा, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्ग असे विविध उपक्रम राबवले जातात. या सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या वर्षी डीआरपीपीएलने पुढाकार घेतला. स्थानिकांच्या हितासाठी राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमांतून जास्तीत जास्त धारावीकरांना लाभ मिळावा, या हेतूने २५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना डीआरपीपीएलने आर्थिक सहाय्य करून मदतीचा हात दिला.

युथ एंगेजमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत धारावीतील लहान – मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. यामुळे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी या मंडळांना मदत होऊ शकेल, अशा शब्दांत डीआरपीपीएलच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली.

दहीहंडीमध्ये देखील ३ हजारांहून अधिक गोविंदांना मोफत टी-शर्ट वितरित करण्यात आले होते. तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या महिन्यात धारावीत पहिल्यांदाच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी