मुंबई

सायन पूल वाहतुकीसाठी बंदच, एका महिन्यानंतरही कामाला सुरूवात नाही; प्रवाशांचे हाल

पूल बंद करून एक महिना झाला तरी पुलाचे कोणतेही काम सुरू न झाल्याने या पुलावर मुलांचे क्रिकेट सामने सुरू झाले आहेत.

Swapnil S

मुंबई : सायन रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपूल धोकादायक झाल्याने तो सर्व वाहतुकीसाठी १ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्याय मार्गाने वळविण्यात आल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मात्र पूल बंद करून एक महिना झाला तरी पुलाचे कोणतेही काम सुरू न झाल्याने या पुलावर मुलांचे क्रिकेट सामने सुरू झाले आहेत. त्यामुळे या पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.

मध्य रेल्वेच्या पाचव्या सहाव्या मार्गिकेचे काम आणि पूल धोकादायक झाल्याने पूल तोडून त्याजागी नवीन पूल उभारण्यात येणार आहे. या कामासाठी सायन पूल बंद केला आहे. यामुळे विविध भागात वाहनकोंडी होऊन नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. यामुळे सायन उड्डाणपूल लवकरात लवकर बांधण्यात यावा तसेच शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी वेगळा पर्यायी पूल उभारण्याची मागणी धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.

पूल बंद करून एक महिना झाला तरी या पुलाचे काम सुरू झालेले नाही. पुलावरून वाहने जाऊ नयेत यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूने रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच पुलावरील डांबरी रस्ता तोडण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कोणतेही काम येथे सुरू नसल्याने धारावीतील लहान मुलांनी या पुलाचा ताबा घेतला आहे. पुलावर मुले क्रिकेट खेळत असून नागरिकही खुल्या हवेसाठी पुलावर येऊन बसत आहेत.

रेल्वे आणि महापालिका प्रशासनाने या पुलाचे तातडीने काम सुरू करून वेळेत पूल वाहनांसाठी खुला करावा, अशी मागणी धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक अनिल कासारे यांनी केली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी