मुंबई

सायन रेल्वे पूल २ वर्षे बंद राहणार, धारावीतील वाहतूककोंडीतून करावा लागणार प्रवास

१ ऑगस्ट २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत नवीन पूल उभारण्यात येणार आहे. यामुळे वाहनचालकांना धारावीतील पुलावरून प्रवास करावा लागणार आहे.

Swapnil S

मुंबई : सायन-वांद्रेला जोडणारा महत्त्वाचा सायन रेल्वे पूल १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी दोन वर्षांसाठी बंद करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत नवीन पूल उभारण्यात येणार आहे. यामुळे वाहनचालकांना धारावीतील पुलावरून प्रवास करावा लागणार आहे. यामुळे वाहतूककोंडीचा मोठा सामना करावा लागेल.

गेल्या काही महिन्यांपासून सायन पूल पाडण्याचे काम सुरू आहे. दहावी, बारावी परीक्षेमुळे आणि लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी पूल तोडण्यास विरोध केल्याने पुलाचे तोडकाम लांबणीवर टाकले होते. आयआयटीच्या अभियंत्यांनी हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल दिल्याने या पुलावरील जड वाहनांना बंदी करण्यात आली. त्यामुळे सायन-वांद्रेकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. या पुलामुळे मध्य रेल्वेच्या पाचव्या, सहाव्या मार्गिकेला अडथळा निर्माण झाला आहे. या पुलाचे काम मध्य रेल्वे आणि महापालिका एकत्र करणार आहे.

या पुलावरील वाहतूक धारावीतील ९० फूट आणि ६० फुटी रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे. यामुळे आधीच वाहतूककोंडी होणाऱ्या या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी