मुंबई

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न तातडीने सोडवा - अश्विनी भिडे

यंदाच्या पावसाळ्यातही कुर्ला पूर्व नाईक नगर सोसायटीतील इमारत कोसळली आणि १९ जणांना जीव गमवावा लागला

प्रतिनिधी

दरवर्षी पावसाळ्यात अतिधोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. यंदाच्या पावसाळ्यातही कुर्ला पूर्व नाईक नगर सोसायटीतील इमारत कोसळली आणि १९ जणांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न तातडीने सोडवा, पोलिसांच्या सहकार्याने कार्यवाही करण्याचे निर्देश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी संबंधित यंत्रणांना दिले. तसेच दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करावी, असे भिडे यांनी यावेळी संबंधितांना दिले. दरम्यान, मुंबईत ३८३ अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी १०० हुन अधिक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉक्टर संजीव कुमार, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आर. डी. निवतकर, मुंबई पोलीस दलाचे आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी हे विशेषत्वाने उपस्थित होते. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, महानगरपालिकेच्या विविध परिमंडळाचे उपायुक्त, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रशासकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रतिनिधी, मुंबई अग्निशमन दलाचे व बृहन्मुंबई सुरक्षा दलाचे संबंधित अधिकारी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख संगीता लोखंडे यांच्यासह विविध संस्थांचे अधिकारी– प्रतिनिधी उपस्थित होते.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत