मुंबई : थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत ४६ हजार १४३ वाहनांची तपासणी करुन ५ हजार ६७० वाहनचालकावर विविध कलमांतर्गत कारवाई केली. या कारवाईत मद्यप्राशन करून वाहन चालविणारे ३३३ मद्यपी सापडले आहे. त्याचप्रमाणे इतरांच्या जिवीतास धोका निर्माण करुन वाहन चालविल्याप्रकरणी १७ हजार ८०० हजार वाहनांवर ई-चलनद्वारे कारवाई करुन त्यांच्याकडून ८९ लाख १९ हजार ७५० रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवीन वर्षांच्या उत्साहाच्या नादात अनेकांनी नियमांचे उल्लघंन केल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आले आहे. ३१ डिसेंबरला शहरात जागोजागी वाहतूक पोलिसांना तैनात करण्यात आले होते.
इतरांच्या जिवीतास धोका निर्माण करून वाहन चालविल्याप्रकरणी १७ हजार ८०० हजार वाहनांवर ई-चलनद्वारे कारवाई करून त्यांच्याकडून ८९ लाख १९ हजार ७५० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. शहरात स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी ठेवल्यामुळे रात्री उशिरा कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांचा बंदोबस्त
पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पोलिसांचे मार्गदर्शन केले. यावेळी आठ अतिरिक्त आयुक्त, २९ पोलीस उपायुक्त, ५३ सहाय्यक पोलीस आयुक्त, २१८४ पोलीस अधिकारी, १२ हजार ०४८ पोलीस कर्मचारी बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले होते.
उशिरापर्यंत कारवाई
३१ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी १०७ ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन केले होते. ही मोहीम पहाटेपर्यंत सुरु होती. यावेळी ४६ हजार १४३ वाहनांची तपासणी करण्यात आली तर ५ हजार ६७० वाहनचालकावर विविध कलमांतर्गत तर मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्याव ३३३ मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केली.