मुंबई

मध्य रेल्वे मार्गावर गर्डर टाकायला विशेष मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर २१ आणि २२ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण आणि कल्याण- कर्जत विभागावर गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर २१ आणि २२ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण आणि कल्याण- कर्जत विभागावर गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. मध्य रेल्वेचा दि. २१/२२.आणि दि. २२/२३ (रविवार/सोमवार मध्यरात्री) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण आणि कल्याण- कर्जत विभागांत अप आणि डाउन धीम्या आणि जलद मार्गांवर, पाचव्या आणि सहाव्या मार्गावर काम करेल.

ब्लॉक दिनांक : २१/२२ (शनिवार/रविवार रात्री), ब्लॉकची वेळ: ०१.०० ते ०४.३० पर्यंत

गर्डर लाँच करण्यासाठी ब्लॉक

तिसरा नवीन पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान

उल्हासनगर येथे १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज (एफओबी)

कल्याण आणि अंबरनाथ दरम्यान लेव्हल क्रॉसिंग (एलसी) गेटच्या जागी आरओबी

नेरळमध्ये ६ मीटर रुंद एफओबी

ट्रॅफिक ब्लॉक विभाग आणि कालावधी

डोंबिवली-कल्याण अप आणि डाउन धिमा मार्ग (प्लॅटफॉर्मसह – क्रॉसओवर वगळता)

डोंबिवली-कल्याण अप आणि डाउन जलद मार्ग (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओव्हर वगळता)

कल्याण – अंबरनाथ अप आणि डाऊन धिम्या आणि जलद मार्ग (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओव्हर वगळता)

पाचव्या आणि सहाव्या ओळी (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओवर वगळता)

ब्लॉकमुळे होणारे परिणाम

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन ट्रेन क्रमांक ११०७८ डाउन वेरावळ- पुणे एक्सप्रेस भिवंडी स्थानकावर १० मिनिटांसाठी नियमित केली जाईल

मेल/एक्स्प्रेस खालील डाऊन गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या मार्गिकेवर वळवण्यात येतील

ट्रेन क्र. १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस- हटिया एक्सप्रेस

ट्रेन क्र. २२१७७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाराणसी महानगरी एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक २२५३८ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस ईशान्य दिशेकडून येणाऱ्या अप गाड्या कल्याण आणि दिवा/ठाणे स्थानकांदरम्यान ६व्या मार्गावर वळवण्यात येतील:

ट्रेन क्रमांक १८०३० शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

ट्रेन क्र. १२८१० हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

गाडी क्रमांक २०१०४गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

ट्रेन क्र. ११४०२ बल्हारशाह – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस

दक्षिण-पूर्व दिशेकडून येणाऱ्या अप गाड्या कर्जत- पनवेल मार्गे वळवल्या जातील आणि पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबवल्या जातील.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव