मुंबई

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात महालक्ष्मी मंदिरात विशेष प्रार्थना

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी असून, त्यानिमित्ताने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात भक्तीमय वातावरणात विशेष आशिर्वचन प्रार्थना, धूप–आरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले.

Swapnil S

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी असून, त्यानिमित्ताने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात भक्तीमय वातावरणात विशेष आशिर्वचन प्रार्थना, धूप–आरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी झालेल्या धूप–आरतीमध्ये उपस्थित उपनेत्या कला शिंदे तसेच सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व भाविकांनी सामूहिक सहभाग नोंदवला.

यावेळी शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडीच्या वतीने देवी महालक्ष्मीच्या चरणी ३९ किलोचा लाडू प्रसाद अर्पण करण्यात आला. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः देवी महालक्ष्मीची विधिवत पूजा-अर्चना केली. तसेच मंदिरातील तीनही देवी मातांना साडी अर्पण करून भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली. शिवसेना महिला आघाडीच्या उत्स्फूर्त सहभागाने महालक्ष्मी मंदिराचे संपूर्ण प्रांगण भक्तीमय वातावरणात फुलून गेले.

खासदार श्रीकांत शिंदे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व जनसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी, यासाठी देवी महालक्ष्मीच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली महानगरपालिकांमध्ये शिवसेना–महायुतीला चांगले यश मिळाले असून, मुंबई महानगरपालिकेतही महायुतीला भरीव यश मिळाले. यासोबतच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करता यावे, असा संकल्पही यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महालक्ष्मी मंदिर हे मुंबईचे आद्य ग्रामदैवत आहे. येथे नतमस्तक होऊन आम्ही सर्वांनी संकल्प केला आहे की, जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करायचा. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्याला अधिक प्रभावीपणे काम करता यावे, अशीही प्रार्थना देवी मातेपुढे केली. आज महिला पदाधिकारी व महिला आघाडीने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे.”

या कार्यक्रमास मुंबादेवी, कुलाबा, मलबार हिल, वडाळा, बांद्रा पूर्व व पश्चिम, धारावी, शिवडी मतदारसंघातील महिला विभागप्रमुख, विधानसभा प्रमुख, शाखाप्रमुख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्ती, उत्साह व एकात्मतेच्या वातावरणात पार पडला.

IAF AN-32 Aircraft Crash : जोरहाट विमान दुर्घटनेत ५ जवानांचा मृत्यू; सहवैमानिक जखमी, हवाई दलाकडून चौकशीचे आदेश

IAF AN-32 Aircraft Crash : लँडिंगदरम्यान अनर्थ! जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, VIDEO समोर

संरक्षण क्षेत्रात भारताचा नवा विक्रम; शत्रूची मिसाइल्स हवेतच उद्ध्वस्त होणार, DRDO च्या सलग ३ चाचण्या यशस्वी, राजनाथ सिंह यांची माहिती

"प्लिज मला एक संधी द्या, चांगला माणूस बनून दाखवेन"; ३७० रुपयांच्या बिर्याणी वादावर प्रणित मोरेची जाहीर माफी, VIDEO

... म्हणून तक्रार करत नाही; पारंपरिक समाजात लैंगिक गुन्ह्यांविरोधात कुटुंब कचरतात - न्यायालय