मुंबई

कोकण रेल्वेवर उन्हाळी सुट्ट्यानिमित्त विशेष रेल्वेगाड्या

उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सीएसएमटी- करमळी-सीएसएमटी विशेष (साप्ताहिक), लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी विशेष (साप्ताहिक) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम विशेष (साप्ताहिक) गाडी चालविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरून गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ सीएसएमटी- करमळी-सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी चालविण्यात येईल. ही गाडी १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता करमळीला येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०११५२ करमळी ते सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी करमळीवरून दुपारी १:१५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि स्थानकावर थांबेल.

तसेच गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०११३० करमळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (साप्ताहिक) ११ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर शुक्रवारी करमळीवरून दुपारी २.३० वाजता सुटेल व पहाटे ४.०५ वाजता एलटीटीला पोहोचेल.

UPI तिकीट, पास खरेदीवर प्रवाशांना भुर्दंड; ५.९० रुपये अधिक मोजावे लागणार

समृद्धी ते पुणे ६ तासांच्या पाठलागाचा थरार; १.१३ कोटींचा गुटखा जप्त

Mumbai : आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; 'मातोश्री' बाहेर हायव्होल्टेज ड्रामा

१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन

Mumbai : मेट्रोच्या कामादरम्यान दुचाकीवर बॅरिकेड कोसळले; विक्रोळीत प्लंबरचा मृत्यू