मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा संपाचे हत्यार प्रलंबित मागण्यांसाठी उद्यापासून आझाद मैदानावर आंदोलन

१३ सप्टेंबरपासून राज्यभर संप करण्याचा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला

नवशक्ती Web Desk

मुंबई : महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करूनही आणखी चार टक्के वाढ मिळावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संपाचे हत्यार उपसले आहे. सोमवार, दि. ११ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत संप करण्यात येणार असून त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर १३ सप्टेंबरपासून राज्यभर संप करण्याचा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे.

राज्य सरकारने नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ३८ टक्के झाला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनाही तितकाच महागाई भत्ता मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केली आहे. कामगारांच्या मूळ वेतनात वाढ करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणीही केली आहे.

या मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने ११ सप्टेंबरपासून संपाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर १३ सप्टेंबरपासून राज्यातील सर्व जिल्हास्तरावर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने काढण्यात आले आहे.

NEET ची खोटी गुणपत्रिका बनवून जे. जे. हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये बेकायदेशीर वास्तव्य; २१ वर्षीय तरुणाला अटक

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? २०१२ पासून आजपर्यंत काय घडलं?

सोनिया गांधी, राहुल गांधींना मोठा दिलासा! नॅशनल हेराल्ड केसमध्ये कोर्टाने ED ची तक्रार फेटाळली; "FIR नसेल तर मनी लॉन्ड्रींग...

Arjuna Ranatunga: श्रीलंकेत मोठी घडामोड; वर्ल्डकप विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगाला होणार अटक; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

विनम्र राहा! अनुष्का शर्मा-विराट कोहली पुन्हा प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला; भावूक क्षणांचा Video व्हायरल