ICU मध्ये दाखल होणाऱ्या चाैघांपैकी एकाचा होतो मृत्यू; सेंट जॉर्ज रुग्णालयातील धक्कादायक आकडेवारी संग्रहित छायाचित्र
मुंबई

ICU मध्ये दाखल होणाऱ्या चाैघांपैकी एकाचा होतो मृत्यू; सेंट जॉर्ज रुग्णालयातील धक्कादायक आकडेवारी

सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) गेल्या तीन वर्षांत ५२१ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिली. या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल झालेल्या चार रुग्णांपैकी एकजण उपचारादरम्यान मरण पावतो, अशी धक्कादायक माहिती या उत्तरातून समोर आली आहे.

अमित श्रीवास्तव

मुंबई : सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) गेल्या तीन वर्षांत ५२१ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिली. या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल झालेल्या चार रुग्णांपैकी एकजण उपचारादरम्यान मरण पावतो, अशी धक्कादायक माहिती या उत्तरातून समोर आली आहे.

मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२२ ते जुलै २०२५ या कालावधीत आयसीयूमध्ये एकूण २,१५२ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ५२१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्युदर सुमारे २४ टक्के इतका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रवीण दरेकर इत्यादींनी मूळ प्रश्न उपस्थित केला होता. रुग्णालयात सहा महिन्यांनी ‘मॉर्टलिटी ऑडिट’ घेतले जाते. यामध्ये मृत्यूंची कारणे तपासून उपचार पद्धती सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. ऑक्टोबर २०२५ मध्ये माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, आयसीयूतील मृत्युदर ५० टक्के असल्याचे समोर आले. मात्र नंतर मोजणीतील चुकीमुळे हा गोंधळ झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने आकडेवारी दुरुस्त करून २०२२ ते २०२५ या काळात वार्षिक मृत्युदर २३ ते २६ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे कळवले होते.

गंभीर अवस्थेत रुग्ण येतात

रुग्णालय प्रशासनाच्या मते, योग्य संदर्भाशिवाय पाहिल्यास मृत्युदर जास्त वाटू शकतो. अनेकदा ५ ते १० टक्के रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होतात. खासगी रुग्णालयांनी नाकारल्यानंतर किंवा उपचारासाठी खर्च करण्याची शक्ती संपल्यानंतर रुग्णांना सरकारी रुग्णालयात आणले जाते आणि त्या वेळेस आजार अत्यंत प्रगत अवस्थेत पोहोचलेला असतो.

Mumbai : डेंग्यू, मलेरियाच्या आजाराने स्थायी समिती तापली; अपुरे मनुष्यबळ, फॉगिंग मशीनमुळे सदस्य संतप्त

­शिक्षणानंतरही नोकरीची शाश्वती नाही; पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली खंत

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

ठाण्यातील कोलशेतमध्ये धूळ-माती, चिखलाचा कहर; बड्या विकासकांना महापालिकेचा दणका, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा