मुंबई

सेंट जॉर्ज होणार पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन

सुपर स्पेशालिटी कोर्समुळे आता लोकांना उपचारांसाठी इतर रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही

प्रतिनिधी

मुंबई : सीएसटी येथील सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालय करण्यात येत आहे. एमबीबीएसव्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्यूएट आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम येथे शिकवले जातील. यासोबतच हे रुग्णालय वैद्यकीय संशोधन केंद्र म्हणून काम करणार असल्याची माहिती देण्यात आली.

या वर्षीच्या आर्थिक अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रूपांतर करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची आता अंमलबजावणी सुरू आहे. सेंट जॉर्ज रुग्णालय आता पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन केंद्रात रूपांतरित होणार आहे.

आशिया विकास बँकेने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीसाठी अर्थसहाय्य देण्याचे मान्य केल्याची माहिती दिली. त्यापैकी एक म्हणजे सेंट जॉर्ज रुग्णालय आहे, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.

जेजे रुग्णालय समूहात सध्या या गटातील २२५ डॉक्टर दरवर्षी येथे पदव्युत्तर शिक्षण घेतात. आता संस्थेत रूपांतर झाल्याने येथे डॉक्टरांची संख्याही वाढेल आणि लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळू शकतील. कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी हे सर्व सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांतर्गत येतात. येथे सुरू होणाऱ्या सुपर स्पेशालिटी कोर्समुळे आता लोकांना उपचारांसाठी इतर रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. इथेच लोकांना सर्व सुविधा मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

महागाईचा 'घाऊक' भडका; चलनवाढ १२.२९ टक्क्यांवर, ऑक्टोबरमध्ये नवीन उच्चांक

फोर्स वन आता ATS च्या नियंत्रणाखाली; दहशतवादी हल्ल्यांचा काही वेळातच खात्मा

असभ्यता म्हणजे अश्लीलता नव्हे! हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; एअर इंडिया क्रू मेंबरला दिलासा

आरक्षणाच्या चक्राकार धोरणाविरुद्धची याचिका रद्द; नियमांच्या पुनर्विचारासाठी सरकारकडे अर्ज करा - सुप्रीम कोर्ट

Mumbai : पालिका शाळेचा भूखंडही खासगी संस्थेच्या घशात? चारकोपमधील जागा भाडेपट्ट्याने देण्यास काँग्रेसचा विरोध