प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

स्लीपर बसमधून प्रवास करताय हे लक्षात ठेवा; एसटीची सुरक्षा जनजागृती मोहीम सुरु

आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी स्लीपर बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एसटी महामंडळाने 'शयनयान वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन' अभियान सुरू केले आहे.

Swapnil S

मुंबई : आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी स्लीपर बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एसटी महामंडळाने 'शयनयान वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन' अभियान सुरू केले आहे.

या अंतर्गत स्लीपर बसमधील प्रवाशांनी स्वतःची व इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक उपाय व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आग लागल्यास किंवा अपघात झाल्यास बसमधून सुरक्षित बाहेर पडण्याचे काही निश्चित मार्ग असतात, मात्र त्यांची माहिती नसल्यामुळे अनेकदा जीवितहानी वाढते. त्यामुळे आपत्कालीन दरवाजा बसमध्ये असलेला हा मार्ग कधीही अडथळ्यांनी रोखू नये. छतावरील एस्केप हॅच बसच्या छतावर साधारणपणे दोन ते तीन हॅच असतात; आगीच्या प्रसंगी त्यांचा वापर करावा. त्याचप्रमाणे सुरक्षा हातोडी प्रत्येक वातानुकूलित बसच्या खिडकीजवळ असते; काच फोडून बाहेर पडण्यासाठी याचा उपयोग करावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

परिवहन मंत्र्यांचे आवाहन

बसमध्ये चढल्यानंतर धूर, जळक्या वायरी किंवा चार्जिंग पॉइंट गरम होणे दिसले, तर त्वरित चालकाला कळवा. ज्वलनशील पदार्थ, फटाके, पेट्रोलियम पदार्थ घेऊन प्रवास करू नका, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

प्रवाशांनी याचे पालन करावे

  • बसमध्ये बसल्यानंतर सर्व बाहेर पडण्याचे मार्ग ओळखून ठेवा.

  • आपत्कालीन दरवाज्यासमोर सामान ठेवू नका.

  • हातोडी व तिचा वापर ओळखून ठेवा.

  • मानसिक तयारी ठेवा - संकटाच्या वेळी घाबरू नका, शांतपणे कृती करा.

  • कपड्यांना आग लागल्यास पाणी किंवा चादर टाकून आग विझवावी.

  • धूर भरल्यास जमिनीच्या जवळून सरकून बाहेर पडावे.

  • कोणत्याही परिस्थितीत सामान वाचवण्याचा प्रयत्न करू नये.

  • बस सुरू होण्यापूर्वी चालक व वाहक यांनी प्रवाशांना आपत्कालीन मार्गांची माहिती द्यावी.

डॉक्टर आत्महत्या प्रकरण : रणजीतसिंह निंबाळकरांवर विरोधकांचा आरोप; मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले, "चिंता करू नका...

पाकिस्तानात सलमान खान 'दहशतवादी' घोषित; एका विधानाने 'भाईजान' ठरला अतिरेकी

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

झारखंड : रुग्णालयाचा निष्काळजीपणा? थॅलेसेमियाग्रस्त ५ मुलांना HIV ची लागण; दूषित रक्त चढवल्याचा धक्कादायक आरोप

Karad : खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन; रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन