मुंबई

मध्य रेल्वेच्या मुख्य, ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

अभियांत्रिकी आणि देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मुख्य मार्गावर माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मुख्य मार्गावर माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.

मुख्य मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील.

लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील आणि नंतर माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.

ट्रान्स हार्बर मार्ग

ब्लॉक काळात वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/ नेरुळ/ पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन लाईन सेवा आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाणेसाठी सुटणाऱ्या अप लाईन सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वेवरील रविवारचा मेगाब्लाॅक रद्द

पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते बोरिवली स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते रात्री ३ वाजेपर्यंत ३.३० तासांचा ब्लाॅक असेल. तर, भाईंदर ते बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ब्लाॅक असेल. ब्लाॅक कालावधीत विरार/वसई रोड आणि बोरिवली स्थानकादरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या कालावधीत काही लोकल रद्द असतील. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नसेल.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे