मुंबई

सुशांत सिंह आणि दिशाची केस संपलेली नाही; राणेंचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

राज्याच्या इतिहासात अशाप्रकारे कोणत्याही मुख्यमंत्र्यांवर पायउतार होण्याची वेळ ओढावली नसेल

प्रतिनिधी

गणेशोत्सवा पूर्वी महाराष्ट्रातील विघ्न टळले असून आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कोणावरही अन्याय होणार नाही सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांना अत्याचार करून ठार मारण्यात आले. त्यांना गच्चीवरून फेकण्यात आले. असे प्रकार महाराष्ट्रात पुन्हा घडणार नाही असे आश्वास्त करताना ती केस अध्याप संपलेली नाही, असा सूचक इशारा मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.

"राज्यातले सरकार हे कंत्राटी सरकार नसून कायमस्वरूपी सरकार आहे कंत्राटी सरकार गणरायाने येण्यापूर्वी रद्द केले," असे राणे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांची निवृत्तीची वेळ जवळ आली असल्याचेही ते म्हणाले "राज्याच्या इतिहासात अशाप्रकारे कोणत्याही मुख्यमंत्र्यांवर पायउतार होण्याची वेळ ओढावली नसेल. अडीच वर्षाच्या कालखंडात ते मंत्रालयात फक्त तीन तास गेले. बाळासाहेबांच्या नावावर त्यांनी फक्त सहानुभूती मिळवली,"अशी परखड टीकाही राणे यांनी केली.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना त्यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा केला होता. तसेच दुसऱ्या पक्षातून आमदार खासदार चोरणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली होती. स्वतःला स्वप्नही पडत नाही दुसऱ्याचे स्वप्नही चोरा, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

महापालिकेवर भाजपाचा झेंडा

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत परिवर्तन होईल. ज्यांच्या हाती यापूर्वी महापालिका होती त्यांनी मुंबईची दुर्दशा केली. त्यामुळे आता महापालिकेत भाजपची सत्ता नक्कीच येईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.

Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

हर्बल हुक्क्याला कायदेशीर परवानगी; कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायालयाचे राज्य सरकारला कारवाईचे निर्देश

Bihar Assembly Elections 2025 : प्रशांत किशोर यांची माघार

ठाण्यात महायुतीला सुरुंग? भाजप-शिंदे सेनेचा ‘स्वबळावर’ लढण्याचा नारा, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध

मिशन ऑस्ट्रेलियासाठी तयारी सुरू! भारताचे सर्व खेळाडू पर्थ येथे दाखल; सरावानंतर रोहितची गंभीरसह दीर्घकाळ चर्चा