मुंबई

मुंबईत स्वाइन फ्लू वाढतोय !

नवशक्ती Web Desk

मुंबई : यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पावसाळी आजार डोकेवर काढू लागले. त्यातच यंदा मुंबईत स्वाइन फ्लूने विषाणूही सक्रिय झाले आहेत. जुलै महिन्यात १६ दिवसांत नोंदवलेल्या एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के प्रकरणे मुंबईत नोंदवली गेली आहेत. तज्ञांच्या मते, मुंबईकरांनी पुन्हा मास्क आणि सॅनिटायझेशनकडे लक्ष देण्याची गरज आहे यात शंका नाही. यासोबतच ताप आल्यास वेळ वाया न घालवता डॉक्टरांची भेट घ्यावी जेणेकरून हा आजार जीवघेणा ठरू नये.

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुंबईत डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रोसारख्या आजार डोकंवर काढत असताना आता स्वाइन फ्लूचेही रुग्ण आढळून येत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १ जुलै ते १६ जुलै दरम्यान स्वाइन फ्लूचे एकूण ६१ रुग्ण आढळले आहेत, तर पालिका आरोग्य विभागाने वरील दिवसांत ५२ प्रकरणे नोंदवली आहेत. म्हणजेच दररोज सरासरी ३ जण स्वाइन फ्लूने ग्रस्त आहेत. जून महिन्यातही महानगरात ९० जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती.

स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत, पण, फक्त १० ते १५ रुग्णांना दाखल करण्याची आवश्यकता आहे. इतर रुग्ण ओपीडीवर उपचार घेतल्यानंतर बरे होत आहेत. विशेष म्हणजे जून महिन्यातही महानगरात स्वाईन फ्लूने हजेरी लावली आहे. जून महिन्यातही १९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे आढळून आले. असे पालिका रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस