मुंबई

तिकीट खिडक्यांवर टॉकबॅक यंत्रणा; प्रवासी कर्मचाऱ्यांत सुसंवाद यावा यासाठी पश्चिम रेल्वेचा उपक्रम

पश्चिम रेल्वेने ४३६ आरक्षित खिडकीवर टॉकबॅक यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : तिकीट देणारे कर्मचारी व प्रवासी यांच्यात सुसंवाद यावा, यासाठी आरक्षित तिकीट खिडक्यांवर टॉकबॅक यंत्रणा बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पश्चिम रेल्वेने ४३६ आरक्षित खिडकीवर टॉकबॅक यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

तिकीटासाठी खिडकीवर लांबच लांब रांगाची कटकट दूर झाल्यानंतर आता तिकीट खिडकीवर तिकीट देणारे कर्मचारी व प्रवासी यात होणारी शाब्दिक चकमक टाळणार आहे. तिकीट खिडकीवर टॉकबॅक यंत्रणा बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मुंबई सेंट्रल विभागात लोकल आणि मेल एक्स्प्रेसने रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवासी तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकीसमोर रांगा लावतात. त्यानंतर तिकीट काढण्याची वेळ येताच रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नसल्याची समस्या भेडसावते. त्यामुळे काही वेळा दोघांमध्ये वादही होतात. अनेक वेळा ऐकण्यात चूक झाल्याने प्रवाशांना चुकीचे तिकीट मिळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने तिकीट खिडक्यांवर टॉकबॅक यंत्रणा बसवण्यास सुरुवात केली. सध्या पश्चिम रेल्वेच्या ४३६ ठिकाणी टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात आली आहे. यात पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते डहाणू मार्गावरील ३६ स्थानकांचा समावेश आहे.

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

Mumbai Dahi Handi 2026 : मालाडमध्ये विटांचा खांब कोसळला; ७ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल