रेडिएशनमुळे मूत्राशयाचा कर्करोग पुन्हा होत नाही; टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या अभ्यासाचा निष्कर्ष 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

रेडिएशनमुळे मूत्राशयाचा कर्करोग पुन्हा होत नाही; टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या अभ्यासाचा निष्कर्ष

मूत्राशय कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर आधुनिक रेडिएशन थेरपी घेतल्यास कर्करोगाची पुनरावृत्ती टळते, असा निष्कर्ष टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या नेतृत्वाखालील एका महत्त्वाच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये आढळले आहे.

अमित श्रीवास्तव

मुंबई: मूत्राशय कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर आधुनिक रेडिएशन थेरपी घेतल्यास कर्करोगाची पुनरावृत्ती टळते, असा निष्कर्ष टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या नेतृत्वाखालील एका महत्त्वाच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये आढळले आहे.

‘बार्ट’ (BART - Bladder Adjuvant Radiotherapy) नावाची ही चाचणी टाटा मेमोरियल हॉस्पिटल (मुंबई आणि वाराणसी केंद्र) यांसह भारतातील चार कर्करोग केंद्रांमध्ये आठ वर्षांहून अधिक काळ चालवली गेली आणि यात १५३ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. ‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेले हे निष्कर्ष सिद्ध करतात की, जागतिक दर्जाचे कर्करोग संशोधन भारतातून होत आहे.

मूत्राशयाच्या कर्करोगाच्या सुमारे पावपट रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेनंतर पेल्विस (ओटीपोटाचा भाग) मध्ये कर्करोग पुन्हा उद्भवतो. हा असा भाग आहे जिथे उपचारांचे पर्याय अत्यंत मर्यादित आहेत. जेव्हा या भागात कर्करोग पुन्हा पसरतो, तेव्हा रुग्णाचे आयुष्य साधारणपणे केवळ सात महिन्यांचे उरते. ‘बार्ट’ चाचणी दाखवून देते की, रेडिएशन थेरपीमुळे हा धोका निम्म्याहून अधिक कमी झाला आहे.

आधुनिक रेडिएशन मशिन्स ही रुग्णांच्या मनात असलेल्या भीतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत, असे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील ‘बार्ट’ चाचणीचे मुख्य संशोधक डॉ. वेदांग मूर्ती सांगतात. आजची अचूक (प्रिसिजन) रेडिएशन थेरपी निरोगी ऊतींचे रक्षण करून केवळ कर्करोगाच्या पेशींनाच लक्ष्य करते.

५% पेक्षा कमी रुग्णांना गंभीर दुष्परिणामांचा सामना करावा लागला, ज्यात उपचार संपल्यानंतर सुधारणा झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सर्व रुग्णांनी दुष्परिणामांमुळे उपचार न थांबवता आपला औषधाचा संपूर्ण कोर्स पूर्ण केला.

आधुनिक रेडिएशन थेरपी सहा आठवड्यांत पूर्ण होते. नवीन इम्युनोथेरपी औषधे काही रुग्णांसाठी फायदेशीर असली, तरी ती अत्यंत महागडी आहेत. तसेच यासाठी महिने किंवा वर्षभर सलग उपचार घ्यावे लागतात आणि त्याचे स्वतःचे गंभीर दुष्परिणामही असतात. अनेक भारतीय रुग्णांसाठी हे महागडे आणि दीर्घकाळ चालणारे उपचार आवाक्याबाहेरचे आहेत.

मूत्राशयाचा कर्करोग पुरुषांना होतो जास्त

भारतात मूत्राशयाचा कर्करोग हा तुलनेने कमी आढळणारा कर्करोग मानला जातो, परंतु पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त पाहिला मिळते. कॅन्सर रजिस्ट्री डेटा आणि जागतिक अभ्यासानुसार, भारतातील कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी मूत्राशयाचा कर्करोग साधारणपणे १ ते ३% आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमधील याचे प्रमाण कित्येक पटीने जास्त आहे.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...