मुंबई

तेजस ठाकरेंची राजकारणामध्ये ग्रँड एंट्री होणार-किशोरी पेडणेकर

उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशाबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा रंगत आहेत

प्रतिनिधी

तेजस ठाकरे हे ओजस्वी तसेच तेजस्वी आहेत. त्यामुळे तेजस हे नाव कधी राजकारणात आले तर ते ओजस्वी रीतीने काम करतील. तेजस ठाकरेंची राजकारणामध्ये ग्रँड एंट्री होणार,” असे वक्तव्य मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रविवारी केले.

उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशाबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा रंगत आहेत; मात्र अजून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केलेला नाही. आता किशोरी पेडणेकरांनी याबाबतचे संकेत दिले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याबाबतची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

तेजस ठाकरे हे विविध देशांतील जंगलांमध्ये प्राण्यांवर तसेच जैवविविधतेवर संशोधन करत आहेत. “तेजसची ओळखच वेगळी आहे. खेकड्यांना कसे वटणीवर आणायचे हे त्यांना माहीत आहे. वेगवेगळ्या खेकड्यांना त्यांनी तेजस खेकडा, ठाकरे खेकडा अशी नावे दिली आहेत. ते राजकारणात एंट्री करतील का नाही, याबाबत उद्धव ठाकरेच सांगू शकतील,” असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

राजकीय लॉन्चिंगकडे सर्वांचे लक्ष

बंडखोरीनंतर शिवसेनेला सावरण्यासाठी तेजस ठाकरे यांच्या राजकीय लॉन्चिंगकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी मुंबईतील गिरगाव येथील दहीहंडी कार्यक्रमाकरिता शिवसेनेतर्फे लावण्यात आलेल्या पोस्टरवर तेजस ठाकरे यांचेही फोटो झळकले होते. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस शिवसेनेत सक्रिय होऊ शकतात.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री