मुंबई

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय, एसआयटीकडे द्यावा; तेजस्वी घोसाळकरांची मागणी

तेजस्वी यांनी वकील भूषण महाडिक यांच्या वतीने ही याचिका दाखल केली. माझ्या पतीचा मृत्यू हा संशयास्पद असून तपास यंत्रणांना त्याचे ठोस धागेदारे लागलेले नाहीत. घोसाळकर यांची सोशल वर्कर मॉरिस नरोन्हा यांना ८ फेब्रुवारी रोजी हत्या केली होती.

Swapnil S

ऊर्वी महाजनी/मुंबई : शिवसेना नेते (उबाठा) अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे सोपवावा, अशी मागणी अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे केली. यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारला याबाबत उत्तर देण्याचे आदेश दिले.

तेजस्वी यांनी वकील भूषण महाडिक यांच्या वतीने ही याचिका दाखल केली. माझ्या पतीचा मृत्यू हा संशयास्पद असून तपास यंत्रणांना त्याचे ठोस धागेदारे लागलेले नाहीत. घोसाळकर यांची सोशल वर्कर मॉरिस नरोन्हा यांना ८ फेब्रुवारी रोजी हत्या केली होती. नरोन्हा याने त्यासाठी त्याचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याची बंदुक वापरली होती. त्यानंतर नरोन्हा याने स्वत: आत्महत्या केली. तेजस्वी यांनी आपल्या याचिकेत म्हटले की, २०१९ मध्ये बॉडीगार्ड मिश्रा याच्याविरोधात उत्तर प्रदेशातील सराई इनायत पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता. डिसेंबर २०२३ पासून नरोन्हाकडे मिश्रा कामाला होता. विशेष म्हणजे तो सुरक्षा संस्था, कंपनीशी तो संबंधित नव्हता.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश