मुंबई

तात्पुरत्या स्वरूपात कामावर ठेवलेला चालक 'कर्मचारी'च; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

एखाद्या विशिष्ट प्रवासासाठी तात्पुरत्या स्वरूपात कामावर ठेवलेला ड्रायव्हर आणि मालक यांच्यातही 'मालक-नोकर' असे नाते गृहीत धरले जाईल, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. मृत चालकाच्या कुटुंबाला १७वर्षांपासून नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा करीत न्यायमूर्ती जितेंद्र जैन रखडलेली यांनी हा निकाल दिला.

Swapnil S

मुंबई : एखाद्या विशिष्ट प्रवासासाठी तात्पुरत्या स्वरूपात कामावर ठेवलेला ड्रायव्हर आणि मालक यांच्यातही 'मालक-नोकर' असे नाते गृहीत धरले जाईल, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. मृत चालकाच्या कुटुंबाला १७वर्षांपासून नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा करीत न्यायमूर्ती जितेंद्र जैन रखडलेली यांनी हा निकाल दिला.

या निकालाने असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कामगार आयुक्तांचा २०१२ मधील आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला. चालकाचा नोकरीचा कोणताही कायमस्वरूपी पुरावा नसल्याचे सांगत भरपाई नाकारण्यात आली होती. त्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

२९ मार्च २००९ रोजी तिलकधारी गुप्ता हे जवाहरलाल गुप्ता यांच्या मालकीची टोयोटा क्वालिस गाडी चालवत होते. गुप्ता व त्यांचे कुटुंबीय एका अंत्यविधीसाठी राजस्थानला जात असताना गाडीचा अपघात झाला. अपघातात चालक तिलकधारीचा मृत्यू झाला, तर गाडीतील इतर प्रवासी जखमी झाले. मृत चालकाची पत्नी शकुंतला गुप्ता आणि त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांनी कर्मचारी नुकसानभरपाई कायद्यांतर्गत भरपाईसाठी अर्ज केला होता.

बदलीच्या तक्रारीसाठी पोलिसांना कार्यालयात आणणे गैरवर्तन; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण! ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम, पुढील ४८ तास महत्त्वाचे

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार