मुंबई

आयुर्मान संपले; मरीन ड्राईव्ह येथील टेट्रापॉड्स बदलणार

मरीन ड्राईव्ह येथील टेट्रापॉड्स बदलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. १९६० साली पहिल्यांदा मुंबईच्या किनारपट्टीवर टेट्रापॉड्स बसवण्यात आले होते.

Swapnil S

मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील टेट्रापॉड्स बदलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. १९६० साली पहिल्यांदा मुंबईच्या किनारपट्टीवर टेट्रापॉड्स बसवण्यात आले होते. त्यानंतर १९८२ आणि २००२ दरम्यान बसवण्यात आलेल्या टेट्रापॉड्सची झीज झाली असून टेट्रापॉड्सचा आयुर्मान कालावधी संपला आहे. दरम्यान हे टेट्रापॉड्स एम २० गुणवत्ता असलेल्या सिमेंटपासून बनवण्यात आले होते. मात्र, जोराच्या लाटा, चक्रीवादळ आणि पावसामुळे यातील कित्येक टेट्रापॉड्स जीर्ण झाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने येथील टेट्रापॉड्स बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मे २०२५ पर्यंत हे टेट्रापॉड्स बदलले जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोस्टल रोडच्या बांधकामादरम्यान टेट्रापॉड्सचा काही भाग काढून टाकण्यात आला होता. परिणामी मरीन ड्राईव्ह येथील प्रॉमिनेडचा काही भाग लाटांच्या संपर्कात आल्यामुळे त्याचे नुकसान झाले. त्यामुळे मुंबई महापालिकेने यावेळी एम४० गुणवत्ता असलेल्या सिमेंटचे टेट्रापॉड्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या