संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गट सक्रिय; निवडणुकीची जबाबदारी युवासेना निरीक्षकांच्या खांद्यावर

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सक्रिय झाला आहे. ठाकरे गटाने महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी युवासेनेच्या खांद्यावर दिली आहे. यासाठी मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांत युवासेनेच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सक्रिय झाला आहे. ठाकरे गटाने महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी युवासेनेच्या खांद्यावर दिली आहे. यासाठी मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांत युवासेनेच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व निरीक्षकांना स्थानिक कामाचा आढावा घेण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत.

महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने युवासेनेचे नवे निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात जाऊन युवासेनेच्या कामकाजाची तपासणी करणार आहेत. या तपासणीतून त्यांना मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी युवासेनेच्या संघटनात्मक स्थिती याबद्दलची माहिती मिळवणे शक्य होणार आहे.

शाखा अधिकारी आणि गट अधिकारी त्यांच्या पदावर कधीपासून आहेत, त्यांची वये आणि इतर पदाधिकाऱ्यांची स्थिती तपासली जाणार आहे . तसेच आवश्यक असल्यास नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी शिफारसी केल्या जाणार आहे. यासोबतच स्थानिक पातळीवर युवासेना आणि शिवसेना यांच्यात योग्य समन्वय आहे की नाही, हे देखील तपासले जाईल. त्यासोबतच शाखा स्तरावर नियमित बैठका होतात का, शेवटची बैठक कधी झाली आणि एका महिन्यात किती वेळा बैठका होतात, याची माहिती घेतली जाईल. तसेच मतदारसंघातील कॉलेजमध्ये युवासेनेची कॉलेज युनिट्स आहेत का, असल्यास त्यांची यादी आणि नसल्यास त्यामागची कारणे शोधली जाणार.

युवासेनेने नेमलेल्या निरीक्षकांची यादी

  • दहिसर विधानसभा: संदीप वरखडे, सतीश नरसिंग

  • मागाठाणे विधानसभा: हेमंत दूधवडकर, इमरान शेख

  • चारकोप विधानसभा: मयूर कांबळे, संतोष धोत्रे

  • अनुशक्ती नगर विधानसभा: मुकेश कोळी, पोपट बेदरकर

  • शिवडी विधानसभा: गीतेश राऊत, विश्वास पाटेकर

  • दिंडोशी विधानसभा: प्रथमेश सकपाळ, जसप्रीत सिंग वडेरा

  • अंधेरी पूर्व: संकेत सावंत, निलेश गवळी

  • विक्रोळी: अजिंक्य धात्रक, रितेश सावंत

  • वांद्रे पूर्व: बाळा लोकरे, दुर्गेश वैद्य

  • चांदिवली: अजित गावडे, आदित्य महाडिक

येते चार दिवस मुंबई परिसरात ऑरेंज अलर्ट

GST ची हंडी उतरणार; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी केली दरात व्यापक बदलाची घोषणा

स्वातंत्र्य टिकवण्यासाठी भारतीयांनी त्याग करणे आवश्यक! सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत ठाकरे बंधू एकत्र; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे-सेना युती; खासदार संजय राऊतांची घोषणा

दहीहंडी उत्सवाला यंदा राजकीय रंग; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या बक्षिसांची लयलूट