मुंबई

मावळ लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसे आता मतदारसंघांवर दावे ठोकण्यास सुरूवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. मावळमधून पक्षातून कोणताही नेता फुटलेला नसल्याने पक्षाची ताकद आजही मजबूत आहे. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून या मतदारसंघातून ज्याला उमेदवारी मिळेल, त्याला जिंकून आणू, असा विश्वास  शिवसेना नेत्यांनी व्यक्त केला आहे.

मातोश्री निवासस्थानी सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची  बैठक पार पडली. खासदार संजय राऊत, पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर आदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर सचिन अहिर म्हणाले, ‘‘मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचाच उमेदवार असेल. ही जागा जिंकून आणण्याबाबतची चर्चा बैठकीत झाली. मावळमधून लढण्यासाठी शिवसेनेत आणि शिवसेनेबाहेरील अनेक लोक इच्छुक आहेत. काही आमच्या संपर्कात देखील आहेत. त्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. मात्र, मावळमधून जो उमेदवार दिला जाईल, त्याला बहुमताने निवडून आणण्याचे आमचे काम असेल. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) मावळ मतदारसंघावर दावा केलेला नाही. ती आमची हक्काची जागा आहे, असे सांगतानाच लोणावळ्यातून एकही नगरसेवक आमचा फुटलेला नाही. पिंपरी-चिंचवडमधून राहुल कलाटेनंतर कोणीही मोठा नेता गेलेला नाही. त्यामुळे मावळ मतदारसंघातूनही कोणीही गेलेला नसल्याने तेथे पक्षाची ताकद अद्यापही मजबूत आहे, असेही अहिर यांनी सांगितले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस