मुंबई

ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? शिंदे गट दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार

प्रतिनिधी

शिवसेनेतले (Shivsena) दोन तृतियांश आमदार खासदार फोडून ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना खिळखिळी करणाऱ्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुढील लक्ष्य ठरवलं आहे. ज्या शिवसेना भवनातून जवळपास गेली ५ दशकं पक्षाचा कारभार चालला, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले गेले, अनेकांना जिथल्या तिथे न्याय दिला गेला, अनेकांच्या राजकीय आयुष्याला याच शिवसेना भवनातून कलाटणी मिळाली, त्याच शिवसेना भवनावर एकनाथ शिंदे दावा सांगणार, अशी गेली काही दिवस चर्चा सुरु होती. पण आता मुंबईच्या मध्यवर्ती भागातील दादरमध्ये नवं शिवसेना भवन (Shivsena Bhavan) उभारण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. लवकरच यासंदर्भातील पुढील पावलं उचलली जातील, अशी माहिती आहे.

सर्वसामान्य नागरिक त्यांचे प्रश्न घेऊन ते एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईला येत आहेत. तसेच मुंबईकर नागरिक देखील आपल्या अडीअडचणी सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी आहेत. अशा हजारो नागरिकांना भेटण्यासाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागात एखादं प्रशस्त कार्यालय हवं, असा मानस एकनाथ शिंदे यांचा आहे. लवकरच त्या दिशेने पावलं टाकली जातील, अशी माहिती शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे.

ठाकरेंसाठी मोदींची साखरपेरणी; बाळासाहेबांवर स्तुतिसुमने

ठाण्यात महायुतीच्या रॅलीत राडा; दोन टोळ्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे काही काळ तणाव

"...मी कोणाच्या बापाचेही ऐकत नाही", अजित पवार यांचा विरोधकांना इशारा

कल्याणमध्ये ठाकरेंची नवी खेळी; माजी महापौर रमेश जाधवही मैदानात, दरेकर की जाधव, लढणार कोण?

प्रादेशिक असमतोलाचे भान राखणे गरजेचे!