मुंबई

पूवैमनस्यातून तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपीस अटक

पूवैमनस्यातून त्याच्याशी वाद घालून त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती.

नवशक्ती Web Desk

मुंबई : पूवैमनस्यातून नफिस अहमद खान (३३) या तरुणावर लाथ्याबुक्यांसह तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करणाऱ्या वेदप्रकाश प्रेमनाथ चौबे ऊर्फ ललनू चौधरी या आरोपीस जुहू पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता, गेल्या पाच महिन्यांपासून त्याच्या मागावर जुहू पोलीस होते, अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नासीर अहमद बैतुल्ला खान हा गोरेगाव येथे राहत मिडीया शूटींगचे काम करतो. त्याचा नफिस हा मोठा भाऊ आहे. त्याचे त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्याने ती तिच्या दोन मुलांसोबत नवी मुंबईतील माहेरी निघून गेली होती. त्यामुळे तो कधी नासीरच्या गोरेगाव किंवा कुर्ला येथील त्याच्या आईसोबत राहत होता. त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तिचाच वाढदिवस साजरा करण्यासाठी तो ७ मेला विलेपार्ले येथे गेला होता. यावेळी ललनू चौधरीने पूवैमनस्यातून त्याच्याशी वाद घालून त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती.

भारत-इराण हायड्रोकार्बन क्षेत्रात सहकार्य वाढवणार; दोन्ही देशांच्या पेट्रोलियम मंत्र्यांची चर्चा

Satara : कोयना धरणात पावसाची हजेरी; पश्चिम महाराष्ट्रात दमदार पावसाचे आगमन

नववीच्या विद्यार्थ्यांना आणीबाणीवर धडा; NCERT चा निर्णय

संघाला प्रश्न विचारल्यास भाजप का फुत्कारतो? कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांचा सवाल

नसरापूर प्रकरण : खटल्याचा निकाल २९ जून रोजी