मुंबई

करवसुलीचा उच्चांक! पालिकेच्या इतिहासात प्रथमच इतकी मोठी रक्कम जमा

Swapnil S

मुंबई : सरत्या वर्षात मालमत्ता करापोटी मुंबई महापालिकेच्या तिजोरीत ३ हजार १९६ कोटी जमा झाले आहेत. यात १ ते ३१ मार्च या एकाच महिन्यात तब्बल २ हजार ४२५ कोटींचा कर जमा झाला आहे. एकाच महिन्यात मालमत्ता करापोटी २ हजार ४२५ कोटी रुपये जमा झाल्याने पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने ही विक्रमी कामगिरी केली असून पालिकेच्या इतिहासात प्रथमच हा उच्चांक गाठला आहे.

दरम्यान, २६ फेब्रुवारीपासून मालमत्ता कराची बिल पाठवण्यास सुरुवात केली आहे. बिल पाठवल्यानंतर ९० दिवसांत बिल भरण्याची मुदत असल्याने १ हजार ३०४ कोटी रुपये २५ मेपर्यंत जमा होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत ९ लाख ५५ हजार ३८ इतक्या मालमत्ता आहेत. यापैकी ३ लाख ५६ हजार ६५२ मालमत्ता ५०० चौरस फुटांच्या असल्याने जानेवारी २०२२ पासून मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे.

गेल्या चार वर्षांत असा जमा झाला कर!

  • सन २०२०-२१ : ७३० कोटी रुपये

  • सन २०२१-२२ : १ हजार ३८८ कोटी रुपये

  • सन २०२२-२३ : १ हजार १७९ कोटी रुपये

  • सन २०२३-२४ : २ हजार ४२५ कोटी रुपये

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस