मुंबई

गणपतीपुळे येथे मिळालेल्या त्या ब्लू व्हेलच्या पिल्लाचा अखेर मृत्यू; तब्बल ४० तासांचे पिल्लाला सागरात पुन्हा सोडण्याचे प्रयत्न विफल

मृतदेह पुन्हा सागरकिनाऱ्यावर पडलेला आढळला असल्याची माहिती उप वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी दिली.

नवशक्ती Web Desk

मुंबई : गणपतीपुळे येथील सागर किनारी आलेल्या तब्बल ३५ फूट लांब व ४ टन वजनाच्या ब्लू व्हेल माशाला ४० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बुधवारी पुन्हा समुद्रात सोडण्यात यश आले असे वाटले होते. मात्र दुर्दैवाने काही तासांनी त्याच्या प्रकृतीत काही गुंतागुंत निर्माण झाली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा मृतदेह पुन्हा सागरकिनाऱ्यावर पडलेला आढळला असल्याची माहिती उप वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी दिली.

येथील वनाधिकाऱ्यांनी येऊन त्या ब्लू व्हेलच्या पिल्लाच्या मृतदेहाची तपासणी केली तेव्हा तो मरण पावल्याचे आढळून आले मात्र त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, ते समजू शकमार नाही. त्यासाठी आता गोव्याचे पशुवैद्यकांचे पथक येऊन तपासणी करील आणि त्या पिल्लाच्या मृत्यूचे कारण निश्चित करील, असे देसाई यांनी सांगितले.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे