मुंबई

३१ डिसेंबरपूर्वी पालिका करणार हॉटेलची तपासणी; अग्निशमन यंत्रणा नसल्यास नोटीस बजावणार

सरत्या वर्षाला निरोप द्यायला अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच हॉटेलमध्ये थर्टी फर्स्ट पूर्वी फायर फायटिंग सिस्टीम नसेल तर पालिका नोटीस बजावून कठोर कारवाई करणार आहे.

Swapnil S

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप द्यायला अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच हॉटेलमध्ये थर्टी फर्स्ट पूर्वी फायर फायटिंग सिस्टीम नसेल तर पालिका नोटीस बजावून कठोर कारवाई करणार आहे. यासाठी पालिकेकडून ३१ डिसेंबरपूर्वी सर्व हॉटेलची तपासणी केली जाणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. तसेच नोटीस बजावूनही अग्निशमन यंत्रणा नसल्यास यंत्रणा तातडीने बसवण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

मुंबईमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक मुंबईकरांचा ओढा हा मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या पार्ट्याकडे असतो. यामध्ये तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. या ठिकाणी खाद्यपदार्थही बनवण्यासाठी सुविधाही उपलब्ध केलेली असतात. मात्र, आवश्यक ती काळजी घेतली नसल्यास आगीच्या दुर्घटना घडून जीवाची - वित्तहानी होण्याचा अधिक धोका संभवतो. त्यामुळे पालिकेकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. यामध्ये आता ३१ डिसेंबरआधी मुंबईतील सर्व हॉटेलमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याबाबत खातरजमा करून यंत्रणा नसलेल्या हॉटेल्सना नोटीस बजावण्यात येणार आहे.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती