मुंबई

दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलण्यात येणार

कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा अशा तक्रारींचा पाढा यापूर्वी सभागृह व स्थायी समितीत सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी वाचला

प्रतिनिधी

पाणीगळती व दूषित पाणी रोखण्यासाठी दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल २८ कोटी ८६ लाख १ हजार १०० रुपयांचा खर्च अपेक्षित असून, निविदा मागवण्यात आल्याचे जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा अशा तक्रारींचा पाढा यापूर्वी सभागृह व स्थायी समितीत सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी वाचला आहे; मात्र आजही दूषित पाणी व गळती या समस्या ‘जैसे थे’ आहेत, तर पाणीगळतीमुळे दिवसाला ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. दूषित पाणी व पाणीगळती रोखण्यासाठी दरवर्षी मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र मुंबईकरांची या त्रासातून सुटका होऊ शकलेली नाही. त्यात आता दक्षिण मुंबईतील कुलाबा, भायखळा, सेंडहर्स्ट रोड, मस्जिद बंदर व मलबार हिल परिसरातील दूषित पाणी व गळती रोखण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. १८ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असून, अनुभवी कंत्राटदाराला दोन वर्षांसाठी दूषित पाणी व पाणीगळती रोखण्याचे २८ कोटी ८६ लाखांचे कंत्राट देण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या जल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल