मुंबई

परदेशात जाणाऱ्या प्रवाशांनसाठी तिसऱ्या डोसचा कालावधी सहा महिन्यांनी कमी

प्रतिनिधी

कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही लसीच्या मात्रा घेतलेल्यांना आता तिसरा डोस (बूस्टर) तीन महिन्यांनी म्हणजेच ९० दिवसांनी घेता येणार आहे. याआधी तिसरा डोस नऊ महिन्यांनी दिला जात होता; मात्र त्यातील सहा महिन्यांचा कालावधी कमी केल्याने आता तीन महिन्यांनी बूस्टर डोस घेता येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी दिली. दरम्यान, यामुळे परदेशात जाणाऱ्या हजारो लोकांना लाभ होणार आहे.

कामानिमित्त देशाबाहेर जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करणे गरजेचे असणाऱ्या व्यक्तींना या कालावधीत सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. या अनुषंगाने संबंधित तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार आता सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय प्रवास करणे गरजेचे आहे, अशा व्यक्तींना आता दुसरा डोस घेतल्यानंतर किमान ९० दिवसांनी तिसरा डोस घेता येणार आहे, अशी माहिती एका विशेष पत्राद्वारे भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कळविली असल्याचे संजीव कुमार यांनी सांगितले.

या ठिकाणी मिळणार बूस्टर डोस

आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी व वय वर्षे ६० पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना सदर सुविधा शासकीय व महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर मिळेल‌. तसेच १८ वर्षे ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर सदर सुविधा उपलब्ध असेल.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण