मुंबई

मुलाला भेटण्याचा बापाचा हक्क नाकारता येणार नाही; हायकोर्टाने आईची याचिका फेटाळली

Swapnil S

मुंबई : मुलाच्या योग्य संगोपनासाठी आईबरोबरच पित्याचेही प्रेम तेवढेच महत्त्वाचे असते. त्यामुळे मुलाला भेटण्यापासून जन्मदात्या पित्याला रोखता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयने दिला. न्या. शर्मिला देशमुख यांनी पित्याला आपल्या मुलाला दर महिन्याच्या पहिल्या रविवारी चार तास भेटण्याची मुभा दिली आहे.

याचिकाकर्ती ज्योत्स्ना पवार (नाव बदलले आहे) हिने कनिष्ठ न्यायालयात सांगितले की, आपण गरोदर असताना पतीने सासरच्या घरातून बाहेर काढले. मुलाच्या प्रसूतीचा सर्व खर्च माझ्या आई-वडिलांनी केला. मुलाचा जन्म झाल्यापासून पुढील सहा वर्षांत पतीने एकदाही मुलाची किंवा आपली भेट घेतली नाही. अशा स्थितीत पतीला मुलाची भेट घेण्यास मुभा दिली, तर मुलावर परिणाम होईल, असा दावा ज्योती साळवी (नाव बदललेले) हिने याचिका दाखल केली होती.

केवळ पिता मुलाला त्याच्या जन्मापासून एकदाही भेटला नाही म्हणून पित्याला मुलाची भेट घेण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, असे कनिष्ठ न्यायालयाने स्पष्ट केले. या विरोधात ज्योस्ना पवार हिने उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्या. शर्मिला देशमुख यांच्या समोर सुनावणी झाली.

कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्यच असल्याचे स्पष्ट करत दर महिन्याच्या पहिल्या रविवारी चार तास मुलाला भेटण्याची सशर्त परवानगी न्यायालयाने पित्याला दिली. तसेच मुलाच्या देखभालीसाठी पती काहीच खर्च करीत नसेल, तर त्यासाठी कनिष्ठ न्यायालयाकडे स्वतंत्रपणे अर्ज करण्यास याचिकाकर्तीला मुभा राहील.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त