मुंबई

मुंबईतील होमक्वारंटाईन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली...

गिरीश चित्रे

सध्या मुंबईत कुठलेही निर्बंध नसल्याने प्रत्येक जण कामानिमित्त घराबाहेर पडत आहे. त्यामुळे गर्दी वाढली असून कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखाद्या इमारतीत, चाळीत एक रुग्ण आढळला तरी त्या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करा, असे निर्देश संबंधितांना देण्यात आल्याचे गोमारे यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी केल्यानंतर संशयित आढळणाऱ्या रुग्णांना होमक्वारंटाईन करण्यात येते. मुंबईत सद्य:स्थितीत ८ जूनपर्यंत ८४ हजार २९१ जण होमक्वारंटाईन असल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी होमक्वारंटाईन करण्यात येत असून, क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींनी पाच दिवसांनंतर पुन्हा चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुंबईत कोरोनाचा गुणाकार सुरू झाला असून, कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे कुटुंबीय, संपर्कात आलेले यांची कोरोना चाचणी करण्यात येते. एका बाधित रुग्णांच्या संपर्कातील आठ ते १० व्यक्तींची चाचणी करण्यात येते. त्यामुळे सध्या होमक्वारंटाईन असलेल्या व्यक्तींची संख्या ८४ हजारांच्या घरात आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर मुंबईकरांना दिलासा मिळाला असतानाच चौथ्या लाटेने गुणाकार सुरू केला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत सध्या आठ हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण असून, लक्षणे नसलेले ६,२३० संशयित रुग्ण आहेत. तर ७६५ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. तर पाच गंभीर रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली असून, रोज १८ हजार चाचण्या करण्यात येतात. चाचण्यांची संख्या वाढवत रोज २५ हजार चाचण्या करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, आतापर्यंत एक कोटी ७२ लाख ४४ हजार ८२६ कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

...तर सगळ्यांची चाचणी करा!

तसेच संशय असल्यास रहिवाशांनी स्वतःहून चाचणी करत योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे

क्वारंटाईनची आकडेवारी

मार्च २०२०पासून आतापर्यंत एक कोटी ३६ लाख तीन हजार ८३५ रुग्णांनी क्वारंटाईनचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. सध्या ८४,२९१ रुग्ण होमक्वारंटाईन आहेत.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन