मुंबई

नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारलेली नाही - शरद पवार

मी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोललो, त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचा प्रमुख झाल्यावर तो राज्याचा प्रतिनिधी होतो

प्रतिनिधी

देवेंद्र फडणवीस यांनी नाराज मनाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यासारखे वाटत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसते की त्यांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारलेली नाही. भाजपमध्ये एकदा आदेश आला की तो पाळायचा असतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपला लगावला. ‘मी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोललो, त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचा प्रमुख झाल्यावर तो राज्याचा प्रतिनिधी होतो, राज्याचे सर्व विभागातील लोकांचे प्रश्न सोडवण्याची कामगिरी त्यांच्याकडून व्हावी,’ असे मत त्यांनी बोलून दाखवले.

शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस

“मला प्रेम पत्र आलेय... इन्कम टॅक्सचे प्रेमपत्र... २००४, २००९, २०१४ आणि २०२० साली लढवलेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राबद्दल इन्कम टॅक्सने नोटीस पाठवली आहे.”

असे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आयकर विभागाची नोटीस आल्याची माहिती दिली.

"२० जुलैपर्यंत जिवंत राहीन, नाहीतर भूत बनून परत येईन"; सोनम वांगचुक उपोषणावर ठाम

कल्याण-सीएसएमटी लोकलमध्ये डोंबिवलीहून 'डाउन' प्रवासामुळे राडा; महिलेने थेट पेपर स्प्रे फवारला

Mumbai : प्रस्तावित 'रेल्वे टर्मिनस' लटकले; रेल्वे, संरक्षण मंत्रालयात जमिनीचा वाद

Mumbai : आता कोस्टल रोडमध्ये बहुभाषिक फलक

बोगस पॅथॉलॉजिस्टची चौकशी होणार; NABL चा निर्णय