मुंबई

50 खोके एकदम ओक्के... विधानभवनाच्या परिसरात विरोधक एकवटले

जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते अशा प्रकारे घोषणा देत असल्याचे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे

प्रतिनिधी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीने (MVA) विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक आंदोलन केले. 50 खोके एकदम ओक्के सरकारचा धिक्कार असो. देशद्रोह्यांच्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या सर्व घोषणानंतर एकनाथ शिंदे यांचे आमदार आणि भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधानभवनात पोहोचलेल्या गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आंदोलन करणारे आणि घोषणाबाजी करणारे सर्वच सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते अशा प्रकारे घोषणा देत असल्याचे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे.

25 ऑगस्टपर्यंत अधिवेशन

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. हे अधिवेशन 25 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी फारच कमी वेळ असल्याचे मतही विरोधकांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडीने शिंदे सरकारला घेराव घालण्याची तयारी केली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला होणारा विलंब, पालकमंत्र्यांच्या अभावामुळे विविध जिल्ह्यांतील रखडलेल्या समस्या, पूरग्रस्तांना झालेली मदत या मुद्द्यांवरून विरोधक अधिवेशनात सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.

माविआ विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमले

विधिमंडळ अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आज महाविकास आघाडी सरकारचे विविध नेते एकत्र आले. शिंदे-भाजप सरकारविरोधी घोषणा देणाऱ्या नेत्यांमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, एकनाथ खडसे आदी नेते होते. विशेष म्हणजे भाजपमधील अंतर्गत नाराजीच्या नाट्यावर माविआच्या नेत्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

दोस्त दोस्त ना राहा...

प्रदूषण रोखण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्नांची गरज

आजचे राशिभविष्य, २२ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला