मुंबई

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला,७९.३६ नवी नीचांकी पातळी गाठली

महागाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या दरात झालेली वाढ या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस रुपयाची घसरण सुरु आहे

वृत्तसंस्था

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरु असून मंगळवारी तब्बल ४१ पैशांनी घसरुन ७९.३६ ही नवी नीचांकी पातळी गाठली.

विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीचा मारा सुरु ठेवत पैसे काढून घेण्याचा सपाटा सुरु असून वाढती महागाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या दरात झालेली वाढ या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस रुपयाची घसरण सुरु आहे.

इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये मंगळवारी स्थानिक चलन ७९.०४ वर उघडला आणि दिवसभरात तो ७९.०२ ही कमाल आणि ७९.३८ ही किमान पातळी गाठली. दिवसअखेरीस तो ४१ पैशांनी घटून ७९.३६ वर बंद झाला. सोमवारी रुपया ७८.९५ वर बंद झाला होता.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार