मुंबई

जागतिक बाजारातील दोलायमान स्थितीनंतर सेन्सेक्स १०९.९४ अंकांनी घसरला

प्रतिनिधी

जागतिक बाजारातील संमिश्र वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दोलायमान स्थितीनंतर सेन्सेक्स १०९.९४ अंकांनी घसरला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेरीस १०९.९४ अंक किंवा ०.२० टक्का घसरुन ५४,२०८.५३ वर बंद झाला. दिवसभरात त्याने ५४,७८६ ही कमाल तर ५४,१३०.८९ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १९ अंक किंवा ०.१२ टक्का घटून १६,२४०.३० वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत पॉवरग्रीड, टेक महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल, लार्सन ॲण्ड टुब्रो, बजाज फिनसर्व, विप्रो, एनटीपीसी आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज यांच्या समभागात घसरण झाली. तर अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स‌, सन फार्मा, आयटीसी आणि ॲक्सिस बँक यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात सेऊल, टोकियोमध्ये सकारात्मक तर शांघायमध्ये घसरण झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत संमिश्र वातावरण होते. तर अमेरिकन बाजारात मंगळवारी घसरण झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.१३ टक्के वधारुन प्रति बॅरलचा भाव ११३.२ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीचा मारा सुरु असून मंगळवारी २,१९२.४४ कोटींच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराने दिली.

Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

कचऱ्यासाठी विशेष मोहीम; BMC चा सोमवारपासून उपक्रम; पंधरवड्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावणार

शहाड उड्डाणपूल १८ दिवसांसाठी बंद; १५ ऑक्टोबरपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर अनिवार्य

CSMT स्थानकातील प्लॅटफॉर्म १८ राहणार बंद; पुनर्विकासासाठी ८० दिवस फलाट बंद; दोन एक्स्प्रेस दादरपर्यंतच चालणार