मुंबई

शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५७८ अंकांनी वधारला

वृत्तसंस्था

वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी जगातील सर्व मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवत आहे. त्याकडे दुर्लक्ष करत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी ५७८ अंकांनी वधारला आहे.

अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व स्वित्झर्लंड व इंग्लंडची मध्यवर्ती बँक पुढील आठवड्यात त्यांचे धोरणात्मक निर्णय जाहीर करतील. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे सावट पसरत असल्याने त्यांच्याकडून व्याजदर वाढीचे संकेत मिळत आहेत.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५७८.५१ अंकांनी वधारून ५९७१९.७४ वर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्स ९६४.५६ अंकांनी वधारून तो ६०,१०५.७९ पर्यंत पोहोचला. तर निफ्टी १९४ अंकांनी वधारून १७,८१६.२५ वर बंद झाला. तर दिवसभरात तो २९७.०५ अंकांनी वधारून तो १७९१९.३० पर्यंत गेला होता.

सन फार्मा, इंडस‌्इंड बँक, डॉ. रेड्डीज लॅब, टाटा स्टील, टायटन, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक आणि एशियन पेंटस आदींचे समभाग वधारले. नेस्ले, पॉवरग्रीड, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आदींचे समभाग घसरले.

पाश्चात्य बाजारात घसरण झालेली असतानाही त्याचा कोणताही परिणाम भारतीय बाजारावर झाला नाही. भारतीय बाजारावर फेडच्या धोरणाचा कोणताही प्रभाव पडण्याची शक्यता नाही. आयटी, फार्मा कंपन्या मंगळवारच्या तेजीत सहभागी झाल्या होत्या. जागतिक बाजाराला आता स्थिरतेची गरज आहे,असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रा म्हणाले की, जागतिक पातळीवर मिळणारे संकेत लक्षात घेऊन बाजार सलग दुसऱ्या दिवशी वधारला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे जगाचे लक्ष लागले आहे. या बैठकीत कोणता निर्णय होतो, यावरून बाजाराचा कल दिसून येईल. जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडी, क्रूड व चलन बदलाकडे गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत.

आशियातील सेऊल, टोकियो, शांघाय व हँगकँग येथील बाजार वधारले. तर युरोपातील बाजार नकारात्मक होते.

तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे दर ०.४९ टक्क्याने वधारून ९२.४५ डॉलर्स प्रति पिंप झाले. तर डॉलर्सच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी वधारून ७९.७४ रुपयांवर बंद झाला. तर परकीय गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजारात ३१२.३१ कोटींचे समभाग खरेदी केले.

नाशिक शिंदेंकडेच! हेमंत गोडसे यांना मिळाली उमेदवारी

अखेर ठरले! महायुतीने ठाण्यातून शिंदे गटाचे शिलेदार नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना दिली उमेदवारी

पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेल्या 'त्या' टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; "वखवखलेला आत्मा..."

LPG Price Cut : व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; आजपासून लागू होणार नवे दर

आज मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट; मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा