मुंबई

शेअर बाजारात घसरण सुरुच,दहा महिन्यांचा नीचांक गाठला

विदेशी गुंतवणूकदारांकडून पैसे काढून घेणे सुरु असल्याने त्याचाही बाजारावर प्रभाव होता.

वृत्तसंस्था

भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात मंगळवारी सेन्सेक्स १५३ अंकांनी घसरला असून त्याने दहा महिन्यांचा नीचांक गाठला आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची भीती आणि कच्याच्या तेलाचे वाढते दरामुळे जागतिक बाजारातील घट झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने दोलायमान स्थितीनंतर दिवसअखेरीस देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली. विदेशी गुंतवणूकदारांकडून पैसे काढून घेणे सुरु असल्याने त्याचाही बाजारावर प्रभाव होता.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स १५३.१३ अंक किंवा ०.२९ टक्का घसरुन ५२,६९३.५७ वर बंद झाला. दिवसभरात तो ३८२.२२ अंक किंवा ०.७३ टक्का घटून १५,७३२.१० ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ४२.३० अंक किंवा ०.२७ टक्का घटून १५,७३२.१० वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत इंडस‌्इंड बँक, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंट‌्स आदींच्या समभागात घसरण झाली. तर दुसरीकडे एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल आणि महिंद्रा ॲण्ड महिंद्रा यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात सेऊल, टोकियोमध्ये घसरण तर शांघायमध्ये वाढ झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत घट झाली होती.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.६८ टक्का भर पडून प्रति बॅरलचा भाव १२३.१ अमेरिकन डॉलर झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी भारतीय शेअर बाजारातून ४,१६४.०१ कोटींच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराने दिली. भारतीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया १ पैशाने वधारुन ७८.०३ झाला. विदेशी बाजारात नैराश्याचे वातावरण असतानाही रुपयावर फारसा दबाव राहिला नाही.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन