मुंबई

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे मुंबई विभागातील काम वेगाने सुरू

कमल मिश्रा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे मुंबई विभागातील काम वेगाने सुरू झाले आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील ९५ टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूसंपादन १०० टक्के पूर्ण झाले आहे.

गुजरातच्या साबरमती येथील बुलेट ट्रेनचे मल्टीमॉडल हबचे ९० टक्के काम पूर्ण झाले. सर्व काही नियोजित वेळेनुसार पार पकडल्यास फेब्रुवारी २०२३ पर्यंत साबरमती मल्टीमोडल हबचे काम पूर्ण होईल.

देशातील पहिल्याच साबरमती मल्टीमोडल हब येथे बुलेट ट्रेन, रेल्वे, मेट्रो व बस रॅपिड ट्रान्सीट सिस्टीम एकत्र जोडल्या जातील, असे राष्ट्रीय जलदगती रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या मुंबई विभागाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक परवानग्या राज्य सरकारकडून मिळाल्या आहेत.

साबरमती येथे साकारण्यात येणाऱ्या मल्टीमोडल हबच्या बांधकामाची माहिती देण्यासाठी पत्रकारांना तेथे नेले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकल्पातील ६.७ किमीच्या व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. ज्यात नवसारीजवळ २ किमी अखंड व्हायाडक्ट आणि ४.७ किमी वेगवेगळ्या ठिकाणी उभारले आहे आणि १८३.३ किमीचे ढिगारे टाकले आहेत, १०४.३ किमी पेक्षा जास्त फाउंडेशन आणि ९३ किमी लांबीवर पिलर्स बांधण्यात आले आहेत. तसेच गुजरात विभागात १७.६ किमीचे गर्डर टाकण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रात या प्रकल्पाच्या प्रगतीबाबत ते म्हणाले की, राज्य सरकारशी संबंधित अनेक विषय सोडवण्यात आले आहेत. निवीदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम