मुंबई

किशोरी पेडणेकरांना तीन दिवसाचा दिलासा जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण

न्यायालयाने याचिकेवर बुधवारी सुनावणी निश्‍चित केली

नवशक्ती Web Desk

मुंबई : कथित जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना तूर्तास तीन दिवसांचा दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कारवाई करणार नसल्याची हमी राज्य सरकारने दिली. याची दखल घेत न्यायामूर्ती एन. जे. जमादार यांनी याचिकेची सुनावणी बुधवारी ६ सप्टेंबरला निश्‍चित केली.

कोरोना महामारीत बॉडी बॅगची चढ्या दराने खरेदी केली. त्या माध्यमातून वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांच्यासह काही पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तथापि, या प्रकरणात आपल्याला नाहक गोवले जात आहे, असा दावा करत पेडणेकर यांनी अ‍ॅड. राहुल अरोटे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. तो अर्ज गेल्या आठवड्यात सत्र न्यायाधीश एस. बी. जोशी यांनी फेटाळून लावला. त्या विरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान देत अटकपूर्व जामीनासाठी याचिका केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जमादार यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी पेडणेकर यांचे वकील अ‍ॅड. सुबोध पासबोला गैरहजर असल्याने न्यायालयाकडे वेळ मागण्यात आला. यावेळी सरकारी वकिलांनी पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठेार कारवाई केली जाणार नाही, अशी हमीच न्यायालयात दिली. याची दखल घेत न्यायालयाने याचिकेवर बुधवारी सुनावणी निश्‍चित केली.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत