मुंबई

तीन अपघातात दोन वयोवृद्ध महिलांसह तिघांचा मृत्यू ;चेंबूर, मशिदबंदर आणि मानखुर्द येथील तिन्ही अपघात

Swapnil S

मुंबई : तीन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत दोन वयोवृद्ध महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. तिन्ही अपघात चेंबूर, मशिदबंदर आणि मानखुर्द येथे झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये बेबी आनंदा चौधरी, मरिअम्मा राजकुमार प्रजापती आणि विजय मनोहर गवस यांचा समावेश आहे. याप्रकरणी मानखुर्द, आरसीएफ आणि पायधुनी पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद करून दोन चालकांना अटक केली, तर तिसऱ्या चालकाने अपघातानंतर पलायन केल्याचे पोलिसांनी सागितले. 

पहिला अपघात शनिवारी सकाळी पावणेबारा वाजता मानखुर्द टी जंक्शनजवळील सर्व्हिस रोड, मंगलमूर्ती जंक्शनसमोर झाला. विजय मोरे हा मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनीत राहत असून, ७२ वर्षांची मृत बेबी चौधरी त्याची आजी आहे. शनिवारी ती मंगलमूर्ती जंक्शनजवळून जात होती. रस्ता क्रॉस करताना एका टेम्पो टेलरने तिला धडक दिली. तिला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसऱ्या अपघातात मरिअम्मा राजकुमार प्रजापती या ६१ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी २० डिसेंबरला ती पी. डिमेलो रोड, कुंदनलाल काटा येथे जात होती. यावेळी तिला एका ट्रकने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला होता.

 तिसरा अपघात चेंबूर, वाशीनाका येथील ईस्टर्न फ्री वे, माला इमारतीसमोर झाला. २० डिसेंबरला चेंबूर येथे राहणारे विजय मनोहर गवस व त्यांचा मित्र अशोककुमार चौरसिया त्यांच्या कारमधून चेंबूरच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांचा मोबाईल खाली पडला होता. त्यामुळे ते मोबाईल घेण्यासाठी कारमधून उतरले होते. याच दरम्यान भरवेगात जाणाऱ्या एका कारने त्यांना धडक दिली होती. जखमी झालेल्या विजय यांना तातडीने शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

"काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली..."शिवाजी पार्क सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?

मुंबईत केजरीवाल Vs मोदी आमनेसामने ; शिवाजी पार्कात महायुती तर BKC मध्ये महाविकास आघाडीची सभा

मंत्री छगन भुजबळ महायुतीवर नाराज? गिरीश महाजन भेटीला, राजकीय चर्चेला उधाण