मुंबई

घाटकोपरमध्ये भीषण अपघात ; जखमींमध्ये तीन विद्यार्थ्यांचाही समावेश

वृत्तसंस्था

मुंबईतील घाटकोपर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. घाटकोपरच्या सुधा पार्क परिसरात ओला चालकाने आठ जणांना उडवले असून भीषण अपघात झाला आहे. ओला चालकाने तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन दुचाकींना धडक दिली. जखमींमध्ये तीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. राजावाडी रुग्णालयात आतापर्यंत आठ जणांना दाखल करण्यात आले आहे. हा ओला चालक घाटकोपर येथील कामराजनगर येथे राहत असल्याची माहिती आहे. सुधा पार्क परिसरात गाडी चालवत असताना अचानक कारने वेग घेतला. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना उडवत तो महामार्गाच्या दिशेने गेला. अपघाताच्या वेळी रस्त्यावर विद्यार्थीही होते. पोलिसांनी ओला चालकाला ताब्यात घेतले आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चालकाचे नियंत्रण सुटले की ड्रग्जच्या अंमलाखाली होते याची माहिती पोलीस घेत आहेत. 

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम