मुंबई

दारू, सिगारेट आणि तंबाखूमुळे गर्भधारणेत अडथळा; प्रजनन क्षमतेवरील घातक परिणामांची धास्ती

महिलांमध्ये वाढणाऱ्या वंध्यत्वाच्या समस्या पाहता तंबाखू, दारू आणि धुम्रपान हे प्रकार प्रजनन आरोग्यावर गुपचूपपणे घातक परिणाम करत असून गर्भपाताच्या शक्यता वाढवत आहेत, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

Swapnil S

मुंबई : महिलांमध्ये वाढणाऱ्या वंध्यत्वाच्या समस्या पाहता तंबाखू, दारू आणि धुम्रपान हे प्रकार प्रजनन आरोग्यावर गुपचूपपणे घातक परिणाम करत असून गर्भपाताच्या शक्यता वाढवत आहेत, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

धुम्रपानामुळे गर्भपात व गर्भधारणा होतानाचा धोका वाढतो. तसेच पुरुषांमधील वीर्यातील डीएनएला हानी पोहोचते, ज्यामुळे गर्भपात व जन्मजात दोष होऊ शकतात, असे डॉक्टर सांगतात.

“प्रजनन समस्या केवळ महिलांपुरत्याच मर्यादित नाहीत, तर पुरुषांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वय, ताण किंवा इतर आरोग्य समस्या यांसह धूम्रपान, दारू व व्हेपिंगसारख्या सवयीही त्याला जबाबदार असतात,” असे मदरहूड हॉस्पिटल्स, खारघर येथील सल्लागार प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुजा थॉमस यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

“या सवयी वैयक्तिक पसंती मानल्या जातात, परंतु त्या प्रजननक्षमतेवरही गंभीर परिणाम करतात. अनेकांना वाटते की गर्भधारणेचे नियोजन करताना तेव्हढ्या वेळेपुरतीच या सवयी थांबवणे पुरेसे आहे. पण प्रत्यक्षात या सवयींना पूर्णपणे टाळणं गरजेचं आहे, कारण यामुळे प्रजनन अवयव, हार्मोन्स आणि भविष्यातील संततीचं आरोग्य यावरही दुष्परिणाम होतो, असं डॉ. थॉमस म्हणाल्या.

“या सवयी हार्मोनल समतोल बिघडवतात, मासिक पाळी अनियमित करतात, प्रजनन क्षमता कमी करतात आणि गर्भपाताचा धोका वाढवतात. दीर्घकाळ यांचा वापर केल्यास गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो आणि गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता वेळ आली आहे की या सवयी कायमच्या सोडाव्यात,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

याच मताला दुजोरा देत, मदरहूड हॉस्पिटल्स, नोएडा येथील वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजू गुप्ता म्हणाल्या की, स्मोकिंग पुरुष व महिलांच्या दोघांच्याही प्रजननक्षमतेवर परिणाम करते.

धुम्रपानामुळे फॅलोपियन ट्यूब्सना हानी

धुम्रपानामुळे फॅलोपियन ट्यूब्सना हानी होते, तर दारूमुळे ओव्ह्युलेशन बिघडते आणि दीर्घकालीन हार्मोनल गडबड होते. व्हेपिंग, सुरक्षित पर्याय समजला जात असला तरी त्यातील रसायने गर्भाशयाच्या अस्तरावर व अंड्यांच्या विकासावर दुष्परिणाम करतात. त्यामुळे गर्भधारणा करण्याचा विचार करणाऱ्या किंवा भविष्यात गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या महिलांनी ह्या सवयी पूर्णपणे सोडाव्यात, असे फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. नेहा त्रिपाठी यांनी सांगितले.

गर्भधारणेचे नियोजन करायच्या काही महिने आधी स्मोकिंग किंवा व्हेपिंग सोडल्याने नुकसान भरून निघेल असे अनेकांना वाटते, पण हा एक मोठा गैरसमज आहे. याचे परिणाम दीर्घकालीन असून, ते पुरुष व महिलांच्या दोघांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करतात. - डॉ. मंजू गुप्ता वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video