PM
मुंबई

कोस्टल रोडवर टोल?

Swapnil S

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्प मुंबईसाठी महत्वपूर्ण ठरणार असला, तरी सर्वसामान्यांना कोस्टल रोडचा प्रवास खिशाला परवडणारा नसेल. कोस्टल रोड ये -जा करणाऱ्या वाहनचालकांकडून टोल आकारण्यात येणार आहे. दरम्यान, कोस्टल रोडवर टोलच्या माध्यमातून मिळणारा पैसा कोस्टल रोड प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यात वापरण्याबाबत विचाराधीन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाची सुरुवात झाली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ झाला. त्यावेळी विना सिग्नल व टोलमुक्त कोस्टल रोडचा प्रवास असे जाहीर करण्यात आले होते.; मात्र आता राज्य सरकार कोस्टल रोडवर टोल आकारण्याच्या तयारीत आहे, असे ट्विट युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

आतापर्यंत ८२.५१ टक्के काम फत्ते

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत ८२.५१ टक्के काम फत्ते झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत कोस्टल रोड प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस