File 
मुंबई

देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने शासकीय अधिकाऱ्यांची बदली

मुख्य आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी सचिवाच्या नावाने शासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढणाऱ्या एका कंत्राटदाराला गुन्हा दाखल होताच राज्य सायबर सेल पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इलियास याकूब मोमीन असे या ४० वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा सांगलीच्या मिरजचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बोगस ईमेल आयडी तयार करून ही फसवणूक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडवणीस यांच्या खासगी खचिवाच्या नावाने एक बोगस ईमेल आयडी बनविण्यात आले होते. त्यांच्या मेलवरून बोगस दस्तावेज सादर करून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागासह उर्जा विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. २३ जुलैला अज्ञात व्यक्तीने सरकारी अधिकाऱ्यांसह कर्मचारी, सहाय्यक अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता पदाच्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले होते. हा मेल नंतर महावितरणाच्या सीएमडींना पाठविण्यात आला होता. अशाप्रकारे बदलीचे आदेश काढून अज्ञात व्यक्तीने त्यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केली होती. हा प्रकार खासगी सचिव असलेल्या विद्याधर महाले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती.

या तकारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांनी ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० ब भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. सायबर सेल पोलिसांनी मिरज येथून मोहम्मद इलियास मोमीनला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानेच बोगस मेल बनवून देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी सचिवाची बोगस स्वाक्षरी करून शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले होते. त्यानंतर त्याला अटक करुन पोलिसांनी पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी