मुंबई

माहीम येथे २८ लाखांच्या एमडीसह दोघांना अटक

एमडी ड्रग्ज विक्री करणारे सराईत गुन्हेगार आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : सुमारे २८ लाख रुपयांच्या एमडीसह दोघांना घाटकोपर युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने माहीम येथून अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी १४० ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले असून अटकेनंतर दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. माहीमच्या कमलानगर परिसरात काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी सकाळी साडेसहा वाजता तिथे दोन्ही तरुण आले असता या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांत १४० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे २८ लाख रुपये आहे. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी एमडी ड्रग्ज विक्री करणारे सराईत गुन्हेगार आहेत. शीव, धारावी आणि माहीम परिसरात त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून एमडी ड्रग्ज विक्रीस सुरुवात केली होती.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण